पाहता पाहता श्री गणेशाच्या आगमनाचा दिवस सुद्धा उगवला परंतु या Pandamic covid-19 चे सावट काही कमी झाले नाही. अख्या जगात थैमान घालणाऱ्या या आजाराची लागण होवू द्यायची नाही म्हणून काय करावे तर म्हणे , योग्य आहार ,व्यायाम, रोगप्रिकारकशक्ती वाढवून आत्मनिर्भर व्हा, खरेच असेल का, हे ..???

हो, हो अगदी खरे आहे. यालाच आरोग्य शास्त्रात “आचार रसायन” म्हणतात. पण मग तसे पहिलं तर आपण आपल्या परीने प्रयत्न करतोच आहोत कि योग्य आहार, व्यायाम ठेवण्याचा. मग काय वेगळं आहे या आचार रसायानात…? थोडक्यात, आचार रसायन म्हणजे सदवृत्त पालन. आयुर्वेद शास्त्रा मध्ये वर्णित दिनचर्या, ऋतुचर्या व रात्रीचर्यादिंचे पालन करून औषधाशिवाय आरोग्यप्राप्ती करणे.

जसे ,पावसाळयामध्ये योग्यआहार हा कमी प्रमाणात ,पचायला हलका, स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी युक्त असावा. मुख्यता गरमा- गरम भजी, बटाटा वडा अशी तळलेले , पचावयास जड असे पदार्थ असतील तर आवर्जुन एकाशन करा. म्हणजे अतिरिक्त खाण्याने होणारे रोग नक्कीच टळतील.

आता योग्य व्यायाम म्हणजे काय तर अर्धशक्ती व्यायाम. आपण मात्र दोन -चार दिवस अगदी थकेपर्यंत व्यायाम करतो, काहीतर अगदी सकाळी उठून व्यायाम केल्यावर झोपले तर चालेल का ? म्हणून विचारतात .व्यायाम म्हणजे नियमित व कपाळावर स्वेदबिंदूयेई पर्यंत करावयाच्या शारारिक हालचाली . जोडीला मनाच्या आरोग्यसाठी राग, लोभ,मद, मत्सरदी षडरिपू पासुन दुर रहा.

करा तर मग श्रीगणेशा “आचार रसायन” पालनाचा, गणेशाचे नाव घेऊन. कारण तोही आरोग्य घेऊनच येतोय आपल्याकडे, हातातील नारळ व साजूक तुपातली मोदक हे वातशमन ,त्याला आवडणाऱ्या दुर्वा पित्तशमन, सर्वात महत्वाचे गणेशाच्या आगमनाने घरा घरात होणारा आनंद, प्रसन्न वातावरण मनाचे व आरोग्य घेवून आलंय.

गणपती बाप्पा मोरया !!!

एक पाउल आरोग्यदायी जीवनासाठी …

Leave a Comment