ऋतूविपर्यास आणि स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ..|

“ शाळा सुरू होणार होत्या म्हणून पावसाला वाटलं जून महिना असेल ”😄😄

सकाळ पासून हा मसेज whtts up ग्रूपवर फिरत आहे. खरंच निसर्गाने सर्वांना विचारात पाडले. दोन दिवस प्रचंड आभाळ भरून आले व आज तर पावसाच्या धारांनी थांबण्याचे नावच घेतले नाही. चक्क ,कडाक्याची थंडी पडणाऱ्या या काळात धडाक्याच्या पावसाने

जोरदार हजेरी लावली …|

वरूणराजाच्या या अचानक आगमनाने आपणास ऋतूविपर्यासास  सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. चालु असलेल्या ऋतूत अचानक दुसर्‍याच ऋतूची  लक्षणे दिसणे म्हणजेच “ऋतू विपर्यास” होय. या अचानक होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे आपल्या प्रकृतीवर देखील वाईट परिणाम दिसून येतात.

 

चला तर मग, या  दुर्दिन वातावरणात आपल्या स्वास्थ्यचे रक्षण कसे करावे ते पाहू या…

1) उषःपान- सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी उकळून त्यात सुंठ (चिमूटभर )/तुळशीपत्र टाकून प्यावे.

2)लहान मुलांना दूधात दालचिनी /सुंठ/हळद टाकून उकळून पिण्यास द्यावे.

3)न्याहारी- उपमा,मुगदाळीचे डोसे,इडली फ्राय,साजूक तूप लावून कलेले भाज्यांची/ भाजणीच्या  पिठाची थालीपीठ असा पचनास  हलका असावा.

4)जेवण – जेवण ताजे, गरम व  पचण्यास हलके असावे. भाजी-चपाती / भाकरी बरोबर ताटात पेय पदार्थ वरण/आमटी किंवा जेवणाआधी सूप आवर्जून असु द्या.

 

 

 

 

 

 

 

संध्याकाळचा आहार  शक्यतोवर अतिशय हलक्या स्वरूपाचा असावा.

5) खाल्लेले अन्न पचण्यासाठी दोन्ही जेवणपुर्वी आल्याचा रस 1चमचा + सैंधव मीठ 1/2 चमचा व जेवणानंतर ओवा/खाण्याचे पान +धन्याची दाळ बारीक चावून खावीत.

6)स्नानापूर्वी,वातशामक तैलाने अभ्यंग करून गरम पाण्याने स्नान करावे.

7)पिण्यास उकळून ,नंतर पितांना कोष्ण पाणी प्यावे.शक्य असल्यास तुळशीपत्र टाकून प्यावे.

9) दुपार अजिबात झोपू नये.रात्री लवकर झोपावे.

8)उबदार कपडे घालावेत. आवश्यकता असल्यासच बाहेर निघावे. वातावरणातील गारठा व गार वारा हानिकारक आहे.

9) रात्री झोपण्यापूर्वी पादांभ्यग करावा.

10) शक्यतोवर या काळात मिश्र म्हणजे हेमंत व वर्षा ऋतूचर्यचे (हिवाळ्या व पावसाळा) नियम पाळावेत.

 

 

 

 

 

 

 

या वातावरणात खाण्यापिण्याचे पथ्य पालन न केल्यास कफदोष विकृत होऊन सर्दी – खोकला,शरीर जड पडणे इ. पित्तदोष विकृत होऊन पचनाचे विकार, खाल्लेला आहाराचे पचन न होणे, अम्लपित्त, त्वचारोग इ.आणि वातदोष विकृत होऊन सांधेदुखी, पोट साफ न होणे ,फुगारा येणे इ. व्याधी बळावतात.

अशी लक्षणे दिसून आल्यास लगेच वैद्यांचा सल्ला घ्यावा. या लक्षणांकडे दुर्लक्ष

केल्यास  विकृत दोष शरीरात राहुन नवीन व्याधी निर्माण करतात वा असलेल्या व्याधींची लक्षणे तीव्र करतात.आपल्या स्वास्थ्यचे रक्षण करण्याकरिता आयुर्वेदात सांगितल्या पंचकर्मांचा ,वमन ,विरेचन,बस्ती,नस्य,कटिबस्ती, मन्याबस्ती,अभ्यंग-स्वेदन इ.कर्मांचा नक्कीच फायदा होतो.

    “पुनर्वित्तं पुनमित्रं पुनर्भार्या पुनर्मही |

       एतत्सर्व पुनर्लभ्यं न शरीरं पुनःपुनः ||”

म्हणूनच आपल्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजेच “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्” अतिशय महत्त्वाचे आहे.

STAY SAFE,STAY HEALTHY …🙂

Leave a Comment