आम्ही स्वस्थ् आहोत का ? आमचे व्याधिक्षमत्व उत्तमोत्तम आहे का ? मला एखादा संक्रमक व्याधि झाला तर? किंवा कर्करोगासारखा दुर्धर आजार झाला तर ..

        पण खरंच आपण कधी विचार केलाय , की आजारांचे मूळ कारण काय आहे ते ? आपल्याला होणारे ७०-८० % आजार हे आपल्या आहार व दिनचर्या मधून आलेला असतो. म्हणजे एखाद्या आजाराचे निदान, शारीरिक लक्षणे व त्यानंतर केलेल्या तपासण्या  नंतर होते. रुग्णानुसार त्यांचे व्याधीचे निदान होऊन काहीच दिवस किंवा आठवडे झालेले असतात . परंतु आयुर्वेदीय दृष्टिकोनातून तो आजार मागील काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून रुग्णांच्या शरीरात चोर पाउलांनी बस्तान मांडायला सुरुवात केलेली असते. यांचे सुंदर वर्णन आचार्य सुश्रुत यांनी षट्क्रियाकाल यामधून वर्णन केलेले आहे.

“ संचयं च प्रकोपं च प्रसरं स्थानसंश्रयम्।

 व्यक्तिं भेदं च यो वेत्ति दोषाणां स भवेद् भिषक्।। – #सुश्रुत. सूत्र. २१/३६. 

   संचय, प्रकोप, प्रसर, स्थानसंश्रय, व्यक्ति, भेद हे सहा क्रियाकाल आहेत. सर्व आजार हे या सहा अवस्थांमधून च विकसित होत असतात.

1.संचय (Stage of Accumulation of Dosha or Incubation Period)

2.प्रकोप (Stage of Aggravation)

3.प्रसर (Stage of Extension of Disease)

4.स्थानसंश्रय (Stage of localisation of Disease)

5.व्यक्ति (Stage of Disease Manifestation)

6.भेद (Stage of Chronicity and Complications)

           आयुर्वेदानुसार मानवी आरोग्याचे तीन महत्वाचे उपस्तंभ (भाग) आहेत, आहार हा सर्वात महत्वाचा भाग. त्यामुळे आयुर्वेदामध्ये आहारा विषयी सखोल वर्णन केलेले आहे. उदा. काय खायचे ? कधी खायचे? किती प्रमाणात खायचे? आहारामध्ये कुठल्या रसांचा (गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट, अश्या चवींना आयुर्वेदात रस म्हटले जाते ) किती प्रमाणात समावेश असावा, तसेच एखादा आहारीय पदार्थ कुठल्या भौगोलिक प्रदेशात व ऋतु मध्ये तयार झालेला आहे व तसेच कोणत्या प्रकारच्या आहाराने, कुठल्या प्रकारचा आजार होतो यांचे सविस्तर वर्णन आयुर्वेदात आलेले आहे.

        बाहेरचे खाद्य पदार्थ, Junk Food, हॉटेल चे पदार्थ खाल्ल्यावरच आजार होतो असे नाही. काही व्यक्ति म्हणतात, डॉक्टर गेले कित्येक वर्षे आम्ही हॉटेल चे खाद्य पदार्थ किंवा Junk Food घेतलेलेच नाही व आरोग्या सामबंधीचे सर्व नियम आम्ही काटेकोरपणे पाळतो तरीही हा अमुक आजार झालाच कसा? असे केविलवाणे प्रश्न बरेचसे रुग्ण करत असतात.

    माझ्या मते आपण किती खातो? कधी खातो? कसे खातो? आणि कश्या सोबत खातो?

तसेच विरुद्ध अन्नाचा असणार समावेश हे आजार होण्यामागचे मुख्य कारण आहे.

    मागील एका दशका पासून आपल्यापुढील आरोग्याच्या समस्या या Metabolic Disorders, Auto-immune Disorders , स्थौल्य पणा, व्यंध्यत्व, मधुमेह, हृदयासंबंधीचे आजार हे आहेत, आणि येणाऱ्या काळात या संबंधीच्या समस्या अधिकाधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्यंध्यत्व व स्त्रियांचे आजार

PCOS, अनियमित मासिक पाळी, गर्भाशयात गाठी होणे, व्यंध्यत्व, Tubal Block, Thyroid असे आजार प्रामुख्याने तरुण मुली ते वयस्कर स्त्रियांमध्ये आढळून येते.

Indian Society of Assisted Reproduction संस्थेच्या मते, वंध्यत्वाचा परिणाम सध्या भारतीय लोकसंख्येच्या १० ते १4 percent टक्के लोकांना होतो आणि शहरी भागात जास्त दर असून तेथे सहा जोडप्यांपैकी एका जोडप्यावर परिणाम होतो.

 श्रेया वय वर्षे १६ हिला दर ६ महिन्यांनी पाळी येते, आणि १०-१५ किलो वजन पण वाढले, तिचे pcos चे निदान झाले. आयुर्वेद चिकीत्से मुळे खूप चांगला फरक जाणवला.

    आनंद आणि स्वाती यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली, गेल्या ३ वर्षांपासून व्यंध्यत्वा साठी आधुनिक चिकित्सा घेत आहे, ivf करून झाले त्यात पण अपयश, दोघांचे प्रकृती परीक्षण पूर्वातिहास जाणून, दिनचर्या, आहार, आयुर्वेदीय औषधे, वमन, विरेचन, बस्ती, उत्तरबस्ती अशी चिकित्सा पूर्ण केली व आता त्यांना ३ वर्षांचा मुलगा आहे.

केस व त्वचा संबंधीचे विकार

        केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा असणे, अकाली टक्कल पडणे, त्वचेवर काळे / पांढरे दाग असणे, Psoriasis, त्वचेचे बुरशीजन्य विकार, त्वचेवर पिंपल येणे.

        सौ. जोशी  त्यांच्या मुलीला अकाली केसगळतीवर आयुर्वेद उपचारने लगेच उपशय मिळल्याने, आठ वर्षाच्या आल्हादचे बहुतेक  केस पांढरे झाल्याने उपचारासाठी  घेवउन आलयात. त्याला त्याच्या  वयाच्या ४-५ वर्ष पासूनच केस पांढरे होण्यास सुरवात झाली होती. शिरोधारा, शिरोपिचू नस्य इ. केसांचे  आयुर्वेद उपचार, केसांसंबंधित घ्यावयाची काळजी व प्रकृतीनुसार आहार विहार विषयीच्या योग्य मार्गदर्शनअने उपशय मिळाला .

         वर्षा हिला, त्वचेवर खाज येणे, लाल चटते पडणे, आग होणे असा त्रास अनेक वर्षापासून होता  त्यासाठी उपचारही  घेतले, परंतु औषधी असेपर्यंत बरे वाटणे व पुन्हा सर्व लक्षणे अधिक प्रमाणात दिसणे असे चक्र चालू होते व आता शरीराच्या बहुतांश भागात त्वचा विवर्ण होण्यास सुरवात झाली होती  तसेच लग्नाजुळल्याने, मुळातून हा त्वचा विकार (psoriasis) जाण्यासाठी क्लिनिक मध्ये आली. रकटमोक्षणदि पंचकर्म, पोटातील औषधे, पथ्याने तिला मिळून तिला उपशय मिळाला.

सोरायसिससारख्या त्वचा विकारामुळे रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या  जीवनमानयावर  लक्षणीयरीत्या  शारीरिक, भावनिक वाईट परिणाम होतात . त्यामुळे अशी बहुसंखत लोक समाज विनमुख होतांना दिसून येत आहेत .

मधुमेह व उच्च रक्तदाब व हृदय संबंधीचे विकार

        भारतात मधुमेहाच्या वास्तविक रुग्णांची संख्या अंदाजे ४  कोटी आहे. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण जगात इतर देशांच्या तुलनेत भारत हा मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असणारा देश आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी २१ टक्के मृत्यू हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होतात.

        साधारण: २ वर्षांपूर्वी  मंदार २८ वर्षे आयटी इंजीनियर, जीर्ण अम्लपित्त व पचनाच्या तक्रारी बद्दल आयुर्वेद उपचार घेण्यासाठी क्लिनिक ला आला होता, त्याची शारीरिक तपासणी व प्रकृती परीक्षण करून, त्याला पंचकर्मांचा सल्ला दिला व भविष्यात हृदया संबंधीचा विकार उद्भवण्याची शक्यता असल्याचे सांगून त्यासंबंधी तपासण्या (ईसीजी, लिपीड प्रोफाइल, homocysteine लेवल इ. ) करण्याचा सल्ला दिला. नंतर वर्षभरानंतर मंदार क्लिनिक ला आणि त्याला आलेल्या हार्ट अटॅक बद्दल सांगू लागला,  त्यावेळेस जर डॉक्टर तुमचे ऐकले असते तर माझ्यावर हि वेळ आली नसती, असे म्हणून पूढील आयुर्वेद उपचार करण्यास पसंती दर्शवली. विरेचन, हृदय बस्ती, हृदय धारा, निरूहा बस्ती व आयुर्वेदीय औषधोपचाराने आज मंदार एकदम स्वस्थ व निरोगी आयुष्य जगत आहे.

 

सांधे व मणक्याचे विकार

        मणक्याचे गादी सरकणे, Sciatica, Spinal Stenosis, arthritis

            १५ वर्षांपूर्वी २०-३० वयोगटातील मुले त्यांच्या पालकांना सांधे किंवा मणक्याच्या विकारसाठी क्लिनिक घेऊन येत असत, परंतु सध्य:स्थितीत हे चित्र पूर्ण पालटलेले दिसून येत आहे, आता वडील तरुण मुलाला मणक्या संबंधीच्या चिकित्सेसाठी/ उपचारासाठी क्लिनिक ला घेऊन येतात.

            संदीप वय वर्षे २८, १० min सुद्धा उभे राहता येत नव्हते. अनेकविध नामांकित hospital मध्ये अस्थि रोग विशेषज्ञा नुसार, ऑपरेशन शिवाय त्याचा आजार बरा होणार नव्हता असे सांगण्यात आले होते, परंतु महिन्या भरात आयुर्वेद औषोधोपचार व पंचकर्माच्या साह्याने त्याला पूर्णत: उपशय मिळाला.

       बरेचदा असे बघावयास मिळते की रुग्नाच्या  अनेक नानाविध तपासण्या झालेल्या असतात, तरीही निश्चित निदान मात्र झालेले नसते. यावरून असे निदर्शनास येते की तरुण वर्ग  मोठया  प्रमाणात अश्या आधुनिक आजाराच्या विळख्यात अडकतांना दिसत आहे आणि भविष्या मध्ये ही समस्या अधिक गंभीर होण्याची दाट शक्यता आहे.

            यामागील कारणे काय असावीत बरे ? जीवघेणी स्पर्धा, करियर, पैसे कामावण्यासाठी पळापळ, पाश्चात्य जीवनशैली, व्यसने, आरोगयाबाबतीत असलेला निष्काळजीपणा, व्यायामाबाबतीत उदासीनता, प्रचंड मानसिक ताण तणाव, पुरेशी झोप न होणे, रात्री जागरण करणे, इत्यादि.

    कारण आपण गेल्या वर्षभरापासून covid-19 सारख्या तीव्र संक्रामक व्याधीला यशस्वीरीत्या सामोरे गेलेलो आहोत आणि भविष्यात यासारखे अनेक तीव्र स्वरूपाचे संक्रामक स्वरूपाचे व्याधि उद्भवु शकतात.

    कोरोना मुळे एका गोष्टीचा नक्कीच फायदा झाला आहे, की लोकांना संक्रमक व्याधीचे गांभीर्य कळले आहे. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण अधिक चांगल्या प्रकारे आचरणात आणत आहेत. ज्यांना मधुमेह, हृदयरोग, Auto immune diseases, metabolic disorders होते अश्या लोकांना कोरोना चे गंभीर स्वरूपाचे परिणामांना सामोरे जावे लागले व हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला. कारण  या लोकांना hIgh risk category मध्ये आधीच नमूद केल्या गेलेल होत. कारण अश्या लोकांचे शरीर हे करोना सारख्या विषाणूनसाठी अतिशय अनुकूल असते. कारण दोषांची साम्यावस्था बिघडलेली असते आणि अश्या परिस्थितीत फक्त immunity वाढविणारी औषधे घेऊन चालणार नाही. आयुर्वेद नुसार स्वस्थ्य असणे म्हणजे

सम दोष समाग्निश्च सम धातु मल क्रियाः |

प्रसन्न आत्मेन्द्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते ||

म्हणजेच वात, पित्त, कफ हे तीन दोष, सात धातू, तेरा अग्नि आणि तीन मल हे सगळे शरीरामध्ये सम स्थितीत असणे त्यासोबतच मन इंद्रिय हे सुद्धा प्रसन्न असणे म्हणजे  सर्वार्थाने निरोगी असणे होय. अश्या परिस्थितीत व्याधिक्षमत्व ही उत्तम असते.

    मग ही शरीरातील दोष दुष्यं साम्यावस्था ( Homeostasis) टिकवून ठेवले तर कुठल्याही प्रकारचे आजार होण्याचे शक्यता नगण्य होऊन जाते.

    मग या करिता चतु:सूत्री चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते.

१. आहार  २.योग्य जीवनशैली ३.आयुर्वेदीय औषधे ४.पंचकर्म

ही कुठल्याही व्याधीसाठीची पूर्ण चिकित्सा होय. म्हणजेच कुठलाही नवीन किंवा जुना व्याधी असल्यास तो मुळासकट व लवकरात लवकर बरा होतो.

आयुर्वेद औषधे ही शरीराच्या कुठल्याही एका भागावर कार्य कारणारी नसून ति सार्वदेहिक स्वरूपात परिणामकारक असतात. पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी होय. यात शरीरात वाढलेले दोष कमी करून, toxins बाहेर फेकल्या जाते व अग्नि वाढविण्यास मदत होते व मेटबॉलीसम ची प्रक्रिया सुधारून शरीराची झीज भरून निघते व विविध आजार बरे होतात. पंचकर्माने शरीर शुद्ध झाल्यामुळे आपण ज्या औषधीचे सेवन करतो त्या योग्य ठिकाणी कमी वेळेत व कमी कोर्समध्ये पोहोचतात. त्यामुळे आजार लवकर बरे होतातम्हणूनच आयुर्वेदात पंचकर्म ही अर्धी चिकित्सा मानली गेली आहे.

  आहार व जीवनशैली ही वय, प्रकृती व ऋतु नुसार वेगवेगळी असते. त्याकरिता आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ल्याने, आहारविधीविशेषयातन  समजून घेणे अत्यंत महत्वाचे व  फायदेशीर ठरते. तसेच घरघुति उपचार करण्या आधी त्याबद्दलचे फायदे-तोटे याबाबत आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि सर्वात महत्वाचे वर्षातून किमान दोनवेळा शरीरशुद्धी करणे अत्यंत गरजेचे आहे.

   आरोग्याच्या मूलमंत्र चारहजार वर्षापूर्वीच सांगितला गेला आहे. आज आपण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत टिकून राहण्यासाठी स्व:ताला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सबल ठेवून पुढे आरोग्या संबंधित येणाऱ्या संकटाना यशस्वीरित्या तोंड देण्याचे सामर्थ्य आत्मसात करणे हा एकच पर्याय आपल्याजवळ आहे.  जपान देशाच्या जनतेचे आयुर्मान (life expectancy) जगभरात सर्वात जास्त आहे तो केवळ त्याच्या जीवानशैलीत योग्य बदलामुळे तर जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा चीन देशाचे आरोग्य त्यांच्या पुरातन आरोग्यशास्त्रावर दृढ विश्वास असल्याने टिकून आहे. आता आपलयाला सुद्धा  डोळे उघळून आपल्या पुरातन व शाश्वत आयुर्वेद नियमांचे पालन करणे अपरिहार्य ठरले आहे .

 

चला तर मग शरीर, इंद्रिय, मन आणि दोषादी घटकांना सम स्थितीत ठेऊया आणि अमृतमय आरोग्यदायी जीवनासाठी एक पाउल पुढे टाकुया.

डॉ. राजेश तायडे
एम डी कायचिकित्सा
www.amrutayurved.com

Leave a Comment