Garbhasanskar A Butterfly Effect

 

तुमचे बाळ कसे असावे, असे तुम्हाला वाटते ? असे जर कोणा दाम्पत्याला विचारले तर त्याचे बहुदा एकच उत्तर आपल्याला मिळेल ते म्हणजे  ‘सर्वगुणसंपन्न”.

असे म्हणतात, जगाच्या एका टोकाला जर फुलपाखराने आपले पंख हलवले तर जगाच्या दुसऱ्या टोकाला वादळ येऊ शकतं, यालाच केओस थेअरीनुसार “बटरफ्लाय इफेक्ट” म्हणतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायचे तर कोणत्याही गोष्टीच्या सुरवातीलाच अगदी  सुक्ष्म बदल केलेत तर अविश्वसनीय असे परिणाम दिसून येतील.

आजची  सुशिक्षित पिढी सर्वांगाने डोळसपणे विचार करणारी आहे. काळानुरूप विकसित झालेल्या जीवनशैली चा पाँझेटिव्ह परिणाम त्यांच्या सुखीसंसारात सुद्धा दिसुन येत आहेत. स्री घरातील काम व तिचे करिअर यांचा उत्तम मेळ घालताना दिसतेय तर पुरूष सुद्धा केवळ नोकरी न करता घरातील कामांत मदत करताना दिसतात आणि याचा उत्तम नमुना आपल्याला या लॉकटाऊन मध्ये दिसलाच आहे. असे सुंदर व बँलन्स आयुष्य चालू असताना एक अतिशय महत्त्वाचा निर्णय ते दोघे घेतात तो म्हणजे बाळाला जन्म देण्याचा. पण नुसतेच बाळाचा जन्म नव्हे तर  सर्वगुणसंपन्न अशी संतती असणे असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. हा निर्णय प्रत्यक्षात येऊन बाळाचा जन्म होतो व एक संपूर्ण कुटुंबाची कल्पना प्रत्ययास येते .

स्रीच्या आयुष्यात घरकाम, करिअर यासोबत मातृत्वाची तर पुरूषास पितृत्वाच्या जबाबदारीची जाण  होते. पण लवकरच हळुहळु हि जाणीव, ताणात परिवर्तित होऊ लागते. काहितरी इम्ब्यालन्स झालेल्या सारखे वाटु लागते. बाळाला सांभाळता – सांभाळता कधी आईच्या स्वास्थावर तर कधी वडिलांच्या स्वाथ्यावर परिणाम होऊन हि जबाबदारी निभवताना तारेवरची कसरत दिसून येते आणि मग डोक्यात विचारांची गर्दी होते … कुठे काही चुकले का ? काही राहुन गेले काय ? होय, रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण बाळाचा विचार करण्याआधी होणा-या आई-वडिलांनी स्वत:च्या स्वास्थाचा विचार केला होता का…? (अर्थातच या ठिकाणी आपण स्वास्थ म्हणजे शारीरिक व मानसिकदृष्ट्या विचार करतोय.)

हा विचार चार हजार वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार या स्वरूपात केला गेला आहे. गर्भसंस्काराचा स्थुल मानाने विचार आपण तीन टप्प्यांत करू शकतो. गर्भसंस्कारांची सर्वात पहिली पायरी म्हणजे यात निरोगी संतान होऊ इच्छिणाऱ्या आई-वडिलांची बीजशुद्धिकरण व रसायन चिकित्सा केली जाते व नंतर ते गर्भधारणेसाठी तयार होतात.

 

 

 

 

 

 

 

 

गर्भसंस्कारांची दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे गर्भधारणेनंतर प्रत्येक महिन्याला आईस व बाळास आवश्यक पोषक आहार, व्यायाम , योगा, यांचा विचार केला जातो  तसेच तिचे मानसिक बल  वाढविण्यासाठी  व आनंदी

राहण्यासाठी वेळोवेळी समुपदेशन केले जाते. असे म्हणतात, की आई हि पोटाने तर वडील मेंदू ने गर्भधारणा करतात आणि खरंच आहे की, गर्भाच्या वाढीनुसार त्याची व त्याच्या आईची काळजी घेणे , वेळोवेळी डॉक्टरांकडे तपासणीकरीता घेऊन जाणे, अशा निरनिराळ्या जबाबदाऱ्यांना वडील सामोरे जातांना दिसतात. त्यामुळे गर्भसंस्कार हा केवळ आई व होणा-या बाळासाठीच नव्हे तर वडिलांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. गर्भसंवादाच्या  तंत्रज्ञानाने आई-वडिलांचा ताण कमी होतोच परंतु बाळासोबत निर्माण होणाऱ्या या ईश्वरीय नात्याचा सुखद अनुभव हे दाम्पत्य घेताना दिसतात.

 

 

 

 

 

 

 

 

गर्भसंस्कारांची तिसरी पायरी म्हणजे बाळाच्या जन्माची तयारी व सुतिका परिचर्या. नाँर्मल डिलिव्हरी म्हणजे काय…? सिझेरीन म्हणजे काय …? याची माहिती , दिवस पुर्ण झाल्यावर घ्यावयाची काळजी, प्रसृतीगृहाची निवड करताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे इत्यादींचा अंतर्भाव यात होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर दिड महिन्यापर्यन्त बाळ व आई यांना जे आहार-विहार संबंधित विशेष नियम पाळायचे असतात त्याचा सुतिका परिचर्येत समावेश होतो.

मंत्रचिकित्सा, समुपदेशन, म्युसिक थेरपी, इ.सुद्धा गर्भसंस्कारामध्ये समावेश होतो. वंशाचे नावलौकिक व आई-वडिलांचे खरे सुख हे आपल्या मुलांच्या किर्तीमध्ये असते. जे पेराल ते उगवेल आणि म्हणुनच गर्भसंस्काराद्वारे  आपल्या मुलांच्या गर्भावस्थेतच संस्कार केलेत तर त्याचा बटरफ्लाय इफेक्ट तुम्हाला त्यांच्या कर्तुत्व काळात नक्कीचं दिसेल.

Leave a Comment